Posts

Showing posts from 2009

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

नमस्कार मंडळी, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्‍या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे. कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे. मी माझ्या समजूतीने एक नाव दिले आहे. निर्मनुष्य नदीच्या काठी उंच गवतातून जाणार्‍या तिला मी विचारले, ' मुली, पदराआड दिवा झाकून तू कुठे बरं चालली आहेस?' माझं घर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे, तुझा दिवा मलादेतेस का? क्षणभर काळेभोर डोळे रोखून तिने त्या धूसर प्रकाशात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, ' मी नदीवर आले आहे ती दिवस मावळताना हा दिवा नदीत सोडून देण्यासाठी' उंच गवतात स्तब्ध राहून मी पाहिली ती थरथरणारी लहानशी ज्योत वाहून गेली प्रवाहासोबत कुणालाच उपयोगी न पडता. रात्र दाटून येताना निरव शांततेत मी तिला विचारले, 'मुली, तुझे घर तर प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे, मग हा दिवा घेऊन तू कुठे निघालीस?' 'माझे घर तर अगदीच काळोखात आणि एकाकी आहे, तुझा दिवा मला दे.' रोखून माझ्याकडे पाहत ती क्षणभर आवंकली, ' मी आले आहे,' ती शेवटी म्हणाली, 'आकाशाला दिवा अर्पण करण्यासाठी.' मी पाहत राहिलो जळून जाणारी ज्य

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

नमस्कार , लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो . अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर् याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात . त्यामुळे दुसर् याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते . पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले . मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे . अगदी लहान नव्हतो . दहावीत वगैरे असेन . गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो . सोबत तीन - चार वर्षे वयांत अंतर असलेले आम्ही चौघे पाच मित्र होतो . मजा करत , हास्य विनोद करत आम्ही चाललो होतो . तेव्हढ्यात आम्हाला दिसले की पदपथावर एक अपंगाच्या चाकाच्या गाडीमध्ये मध्यमवयीन माणूस बसला आहे आणि तो इतरांकडे काही मदतीच्या अपेक्षेने पाहतो आहे . त्याने आम्हा मुलांना बोलावले आणि त्याची गाडी ढकलून थोडे अंतर चढ पार करुन द्