दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)
नमस्कार मंडळी, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे. कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे. मी माझ्या समजूतीने एक नाव दिले आहे. निर्मनुष्य नदीच्या काठी उंच गवतातून जाणार्या तिला मी विचारले, ' मुली, पदराआड दिवा झाकून तू कुठे बरं चालली आहेस?' माझं घर अगदीच काळोखे आणि एकाकी आहे, तुझा दिवा मलादेतेस का? क्षणभर काळेभोर डोळे रोखून तिने त्या धूसर प्रकाशात माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, ' मी नदीवर आले आहे ती दिवस मावळताना हा दिवा नदीत सोडून देण्यासाठी' उंच गवतात स्तब्ध राहून मी पाहिली ती थरथरणारी लहानशी ज्योत वाहून गेली प्रवाहासोबत कुणालाच उपयोगी न पडता. रात्र दाटून येताना निरव शांततेत मी तिला विचारले, 'मुली, तुझे घर तर प्रकाशाने न्हाऊन निघाले आहे, मग हा दिवा घेऊन तू कुठे निघालीस?' 'माझे घर तर अगदीच काळोखात आणि एकाकी आहे, तुझा दिवा मला दे.' रोखून माझ्याकडे पाहत ती क्षणभर आवंकली, ' मी आले आहे,' ती शेवटी म्हणाली, 'आकाशाला दिवा अर्पण करण्यासाठी.' मी पाहत राहिलो जळून जाणारी ज्य