Posts

Showing posts from December, 2008

नीरव पावले (अनुवाद-गीतांजली)

नमस्कार, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील एका गीताचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न करत आहे. नीरव पावले तुम्ही ऐकली नाहित का त्याची नीरव पावले? तो येतो, येतो, नेहमीच येतो प्रत्येक क्षणी प्रत्येक काळी प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री तो येतो, येतो, नेहमीच येतो गायली आहेत मी अनेक गाणी मनाच्या विविध स्थितींमध्ये, परंतु त्यांच्या सुरावटीने नेहमी हेच उद्घोषित केले, 'तो येतो, येतो, नेहमीच येतो' स्वच्छ सुगंधी वसंतात रानवाटांनी तो येतो येतो, नेहमीच येतो आणि पावसाळी गूढ रात्री गडगडाटी ढगांच्या रथातून लखलखत, तो येतो, येतो, नेहमीच येतो दु:खाने विद्ध माझ्या काळजावर त्याचीच पावले उमटतात, आणि त्याच्याच चरणाच्या परीसस्पर्शाने माझा आनंद उजळुन निघतो. मूळ कविता : Silent Steps Have you not heard his silent steps? He comes, comes, ever comes. Every moment and every age, every day and every night he comes, comes, ever comes. Many a song have I sung in many a mood of mind, but all their notes have always proclaimed, `He comes, comes, ever comes.' In the fragrant days of sunny April thr

मेजवानी आणि अनुवादित पुस्तके

नमस्कार , परदेशात आल्यावर अचानक निरनिराळ्या देशांतले लोक एकदम भेटायला लागले आहेत . सर्व काळ भारतातल्या एकाच गावात काढलेल्या माझ्यासारख्याला हा अनुभव फारच मजेदार वाटतो . मागच्या रवीवारी सायंकाळी आमच्या प्राध्यापकांनी त्यांच्या घरी मेजवानीस बोलावले होते . प्राध्यापकांच्या ' कार्यचमु ' मधील आम्ही सर्व दहा पंधरा जण त्यांच्या घरी जमणार होतो . ते स्वतः आणि त्यांच्या शास्त्रज्ञ पत्नी हे दोघेही अतिशय हौशी आणि अगत्यशील आहेत . इंग्लंडमध्ये अनेक वर्षे राहिलेले असल्याने त्यांना अनेक भारतीय लोक आणि भारतीय पदार्थ माहीत आहेत . मला मेजवानीचे आमंत्रण देतानाच त्यांनी मला सांगितले होते की त्यांच्या पत्नी या वेळेस भारतीय ' करी ' आणि ' दाल ' बनवणार आहेत . आणि मला त्यासाठी आवर्जून मेजवानीला यायचा आग्रह केला होता . मेजवानी म्हटले की मी सुद्धा आनंदानेच जातो . कारण अशाच वेळी वेगवेगळ्या स्थानिक पदार्थांची ओळख होते आणि या लोकांच्या पद्धती सुद्धा माहिती होतात . तर मंडळी , जेवणाचा बेत सुं

प्लासिबो - समाधान

प्लासिबो विषयी विचार करता मनात जे आले ते लिहित आहे. आपण अनेकदा प्लासिबो हा शब्द ऐकला आहे. वैद्यकशास्त्रात रुग्णाला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ न देता जेव्हा औषध नसलेला पदार्थ त्याचे समाधान व्हावे म्हणुन देतात तेव्हा त्याला प्लासिबो म्हणतात. रुग्णाचे समाधान करणे हाच त्याचा हेतू असतो आणि बरे होण्याची मनात इच्छा असलेला रुग्ण ते 'फसवे औषध' घेउन बरा सुद्धा होत असतो. माझी आजी म्हातारपणाने थकली होती. तिला सारखे काहीतरी होत आहे असे वाटून डॉरक्टकडे जायचे असायचे. मग अनेकदा आमचे नेहमीचे डॉक्टर गंभीर चेहर्‍याने तिला कोणत्यातरी साध्या गोळ्या देत आणि 'जास्त त्रास झाला तर दवाखान्यात भरतीकरुन सलाईन लावावे लागेल' असे सांगत. मग पुढे काही दिवस तिला एकदम बरे असे आणि डॉक्टर किती हुषार आहेत ते आम्ही ऐकत असू ! खरेतर प्लासिबो प्रकार माहित नसताना सुद्धा आपण अनेकदा तो वापरत असतो. लहान मुल पडले तर त्याला 'आला मंतर कोला मंतर, कोल्ह्याची आई कांदे खाई, बाळाचा बाऊ उडुन जाई ।' हा मंत्र घालून त्याला बरे वाटते. शब्द सूक्ष्म असतात. शब्दापेक्षा कृतीवर किंवा वस्तूवर आपला जास्त विश्वास बसतो. नुसते लग

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (उत्तरार्ध)

नमस्कार मंडळी, माझ्या या शब्दांबरोबरच्या प्रवासात मला अनेक सुंदर जागा मिळाल्या. अशा की जेथे परत परत यावे आणि निवांत थांबावे. यात पहिल्यांदा शब्द येतात बडबड गीतांतले. ते शब्द मला बालवयातल्या आठवणी म्हणूनच आवडतात असे नसून, ते नादमय आणि उच्चारायला सोपे म्हणून मला आवडतात. त्यातला वाळा, तोडे, चांदोबा, गडु, अडगुलं, मडगुलं हे शब्द कसे सुरेख आहेत पाहा. कुठेही क्लिष्टता नाही की उच्चारताना लय बिघडत नाही. त्यातच गडगड, पळ, हळूहळू अशी सोपी क्रियापदेही आपली वर्णी योग्यच लावतात. ळ, ट, ड, ठ ही अक्षरे असलेले शब्द मला अनेकदा खास मराठमोळे वाटतात. जसे वळण, दळण, बाळबोध, दणकट, दांडगट आणि असे अनेक. भाषा शास्त्रीय दृष्टिकोनातून यांचा उगम वगैरे मला माहीत नाही. पण हे अगदी या काळ्या मातीतले, दगडा धोंड्यातले शब्द वाटतात. ते ओबडधोबड भले असतील पण त्यांना इथल्या रांगड्या भूरूपासारखा घाट आहे असे मला वाटते. बंगाली माणूस म्हणेल, 'तुमी कोथाय?' आणि मराठी माणूस म्हणेल, 'तू कुठे आहेस?' त्यात ठ, ह, स कसे ठासून म्हटले आहे पाहा. आपली भाषा मला म्हणूनच या भूमीशी नातं सांगणारी वाटते. साडेसहा कोटी वर्षे छातीचा कोट

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास (पूर्वार्ध)

नमस्कार मंडळी, परवाच 'नक्षत्रांचे देणे -शांता शेळके' या कार्यक्रमाची तबकडी पाहत होतो. त्यात त्या म्हणतात की त्यांचा प्रवास शब्दांपासून चालू झाला. अर्थापासून शब्दाकडे नाही तर शब्दाकडून अर्थाकडे असा. हे ऐकून मला वाटले की माझे सुद्धा बऱ्याच प्रमाणात असेच घडले. कधी लहानपणी 'राजा शिवछत्रपती' मध्ये मेघडंबरी हा शब्द वाचून मी फारच भारावला गेलो होतो. मग 'शब्दरत्नाकरात' त्याचा अर्थ पाहून अधिकच आनंद झाला आणि तो शब्द मनात ठसला. शब्दांच्या बरोबरचा हा प्रवास मोठा रंजक आहे. शब्द कायमच मला मोह घालतात. प्रथम पासूनच मला ध्वनीवरून आलेले शब्द फार आवडतात. ते अतिशय नादमधुर असतात असे मला वाटते. पक्ष्यांची 'किलबिल' असो, वा हंसांचा कलरव. खरोखरच जेव्हा अनेक पाणपक्षी एकदम आकाशात उडतात ना, तेव्हा मी हा 'कलकल' आवाज ऐकला आहे. पोरे शाळेमध्ये करतात तो 'कोलाहल' सुद्धा कधी शाळेत उशीरा पोहोचलो की ऐकायला मिळाला आहे. तळजाईच्या डोंगरावर मी जेव्हा मोराची केका प्रथम ऐकली तेव्हा याला केकावली म्हणतात हे कोणी आठवण करून द्यायची गरज राहिली नव्हती. सिंहगडावर जेंव्हा प्रथम घुबडाचा घुत

आम्ही लिखाळ लिखाळ

आम्ही खट्याळ खट्याळ गूढरम्यतेला चाट, जीवनाच्या खोलीवर आम्ही हास्याची रे लाट. आम्ही घायाळ घायाळ कधी काळजाला हात, भावभरल्या काव्याला असे आसवांची साथ. आम्ही खोड्याळ खोड्याळ आम्हा गमतीची साथ, गंभीर त्या कवितेला विडंबनानेच मात. आम्ही लिखाळ लिखाळ जूनी आमुची जमात, तुम्ही डुलक्याना काढा आम्ही आमुचेच भाट. तुम्ही पानांवर चुना आम्ही चुन्यावर कात, आम्ही ओढाळ लिखाळ आम्ही बाष्कळ लिखाळ तुम्ही कमळ कमळ आम्ही त्यांतील भ्रमर, आमुच्यारे अस्तित्वाला तुम्ही सुगंधी कोंदण.